शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या कारला पाठीमागील वाहनाने धडक दिल्याने कार महामार्गाच्या कडेला उलटून दोघे जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघातात प्रीतम आप्पासाहेब खोत व रोहित आबासाहेब कोतवाल हे दोघे जखमी झाले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रीतम खोत हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ यु एस ७०६२ या कर मधून पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना आह २३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास पुणे बाजूने आलेल्या वाहनाची खोत यांच्या वाहनाला धडक बसल्याने खोत यांची कार रस्त्याचे कडेला उलटली. कार रस्त्याचे कडेला उलटून एका कंपनीच्या भिंतीवर आदळली असल्याने कारचा चेंदामेंदा झाला, तर कार मधील दोघे जखमी झाले.
सदर अपघातात प्रीतम आप्पासाहेब खोत वय २६ वर्षे रा. म्हसवड ता. मान जि. सातारा व रोहित आबासाहेब कोतवाल (वय ३०) रा. हडपसर ता. हवेली जि. पुणे हे दोघे जखमी झाले असून दोघांवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलेले असून याबाबत प्रीतम आप्पासाहेब खोत (वय २६) रा. म्हसवड ता. मान जि. सातारा यांच्या जबाबावरून शिक्रापूर पोलिसांनी अपघाताबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…