शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार, रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस हवलदार अमोल चव्हाण, पोलीस पाटील किरण काळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला.
त्याच्या अंगात काळी पॅन्ट व काळसर शर्ट होता तर अन्य काहीही माहिती मिळू शकली नसून याबाबत निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण अंकुश काळे (वय ३३) रा. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…