शिरूर तालुका

संतोष आवटे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती साठी कार्य करणाऱ्या संतोष आवटे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना नुकताच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील संतोष आवटे यांनी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत या अभियानातून शेकडो नागरिकांना व्यसनमुक्त तसेच मधुमेह मुक्त करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक व्यसनाधीन तरुण व्यसनमुक्त झाले असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकताच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक सादिक शेख, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे सागर देसाई, अस्लम शेख, सुहास पाटील, विशाल जाधव, वित्त विभाग मंत्रालयचे सहाय्यक संचालक अतुल आकुर्डे, मोटार निरीक्षक संदीप गडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय बवले, काकासाहेब भंडारे, नवनाथ चव्हाण यांसह आदी उपस्थित होते. संतोष आवटे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे शिरुर तालुक्यातून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

4 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

4 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

4 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

4 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

4 तास ago