क्राईम

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. ६:३० वाजता बाबुराव नगर येथील शितोळे क्लिनिक मध्ये ही घटना घडली असुन आरोपी रवींद्र शिरसाठ पूर्ण नाव माहित नाही, रा. बाबुराव नगर, शिरूर हा क्लिनिकमध्ये आला व “तू आमचे मेडिकलमध्ये पेशंटला गोळ्या-औषधे घेण्यासाठी का पाठवत नाहीस असे म्हणत फिर्यादी डॉक्टर शितोळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून यावेळी आरोपीने हाताने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर कमरेचा बेल्ट काढून डॉक्टरांच्या हातावर व पाठीवर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली असुन.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. भगत हे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

21 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

21 तास ago