क्राईम

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला कुलूप लावून त्यांच्या कुटुंबियांसह बारामती येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेले होते. सकाळच्या सुमारास शेजारील नागरिक उठले असता भोकरे यांच्या घराचे कुलूप तुटलेले व घरातील लाईट सुरु असल्याचे दिसले त्यामुळे शेजारच्यांनी याबाबतची माहिती भोकरे यांना दिली.

दरम्यान भोकरे यांनी घरी येत घरातील पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले तसेच कपाट उघडे दिसुन आले. त्यामुळे पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा अंदाजे 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे दिसून आले.

याबाबत उत्तम केरु भोकरे (वय ६५) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

4 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

8 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

8 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

9 तास ago