शिरूर तालुका

पिंपळे जगताप मध्ये दिव्यांग जनजागृती रॅली

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाधामच्या दिव्यांग मुलांसह महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून सहभाग घेतला होता.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग सप्ताहच्या निमित्ताने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सोनाली नाईकनवरे, रेश्मा कुसेकर, केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विलास भोंगळे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयचे मुख्याध्यापक वसंत रणशिंग, सचिव विश्वास जगताप, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, रामचंद्र टाकळकर, अशोक नाईकनवरे, सोमनाथ सोंडेकर यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून त्यांना रॅलीमध्ये सहभागी करुन घेत हातामध्ये हात घ्या, दिव्यांगांना साथ द्या अशा घोषणा दिल्या तर मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर जनजागृती माहिती दिली असून नृसिंह कुलकर्णी यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

तसेच पिंपळे जगताप ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले तसेच उद्योजक मिलिंद सुक्रे यांच्या वतीने सर्व दिव्यांग मुलांना दिव्यांग दिनाच्या निमित्ताने उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

प्लेटलेट्स म्हणजे काय

हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील…

4 मिनिटे ago

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अटींचा डोंगर, कुंभमेळ्याच्या इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी!

विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; “दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही का?”…

17 मिनिटे ago

तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगते जिभेचा रंग

जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.…

19 मिनिटे ago

गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन…

1 तास ago

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन…

2 तास ago

‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…

14 तास ago