क्राईम

शिरुर तालुक्यात शेतकऱ्याला दगड-काठीने मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील निमोणे येथे शेतातून पोकलेन व हायवा वाहन नेत असल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन ६४ वर्षीय शेतकऱ्याला दगड, बांबू तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माणिक प्रल्हाद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ च्या सुमारास हि घटना घडली असुन फिर्यादी माणिक प्रल्हाद जाधव हे त्यांच्या शेतात काम करत असताना शरद चंदर काळे आणि भरत भाऊसाहेब काळे हे पोकलेन व हायवा वाहन माती भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. त्यावेळी फिर्यादींनी संबंधितांना, “तुम्ही वाहने कोठे घेऊन जात आहात…?” अशी विचारणा केली.

यानंतर आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ सुरु केली. “तुझ्या बापाची जमीन आहे का…?” असे म्हणत फिर्यादींना खाली पाडण्यात आले. त्यानंतर शरद चंदर काळे याने हातातील दगड फिर्यादींच्या उजव्या डोळ्याजवळ मारला, तर अक्षय भरत काळे याने बांबूच्या काठीने फिर्यादींच्या पाठीत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय भरत भाऊसाहेब काळे, कैलास भाऊसाहेब काळे, राजेंद्र भाऊसाहेब काळे, तेजस भरत काळे आणि तन्मय राजेंद्र काळे यांनी हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी शरद चंदर काळे, अक्षय भरत काळे, भरत भाऊसाहेब काळे, कैलास भाऊसाहेब काळे, राजेंद्र भाऊसाहेब काळे, तेजस भरत काळे आणि तन्मय राजेंद्र काळे, सर्व (रा.निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

50 मिनिटे ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

19 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago