आरोग्य

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात वाढल्याने होणाऱ्या वात व्याधी अर्थातवातरोग म्हणते या बाबत वातपूर्णद्दतिस्पर्शःशोथःसंधिगते अनले।

प्रसारणा आकुंचनयोः प्रवृत्तिश्च संवेदना. चरकसंहिता चिकित्सास्थान या श्लोकात म्हंटल्या प्रमाणे शरीरात वात वाढल्यास वेदना या होतात याची कारणे अनेक आहेत जस की वयोमानानुसार, चुकीच्या खाद्यसवयी,थंड पदार्थ, थंड जागेत वावर यामुळे वात वाढतो हा वाढलेला वात शरीरातील एखाद्या भागात साचल्यास तो भाग दुखायला लागतो आणि वेदना सुरू होतात. वेळीच लक्ष दिले नाही तर वात व्याधी वाढत जाते.

वात कमी करण्यासाठी आयुर्वेदात पाच टिप्स दिलेल्या आहेत त्याचा वापर केल्यास आपण या दुखण्या पासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवू शकतो . हे विधान अतिशयोक्ती पुर्ण जरी वाटत असेल तरी मला खात्री आहे अनेकांना याचा लाभ होऊन पेनकिलर पासून नक्कीच तुमची सुटका होऊ शकते. चला तर मग पाहूया पाच टिप्स.

पाव कप गरमपाण्यात तीळ तेल एक ते दोन चमचे, तीन चिमूटभर सुंठ , एक चिमूटभर सैधव घालून ते रात्री प्यावे

2) बाह्य स्नेहन

इथे आयुर्वेद आपल्याला अभ्यंगम आचरेत नित्यम,स जराश्रमवातहा इथे आयुर्वेद आपल्या नित्यनेमाने रोज तेलाने माँलीश करण्याचा सल्ला देतोय कारण या मुळे लवकर येणारी वृध्दावस्था,थकवा,शरीर पुष्टी, आयुष्यमान वाढवते,गाढ झोप येते, मासपेशी मजबूत बनवते, त्वचेचा वर्ण सुधारते या साठी रोज तेल सुगंधी उटणे याचा मसाज करण्याचा सल्ला देतोय. यासाठी आपण रोज आँईल मसाज करण्यासाठी तीळाचे तेल वापरावे हा सल्ला इथे मी देऊ इच्छितो आणि जर आपल्याला वेदना तिव्र स्वरुपाच्या असतील तर आपण महानारायण, दिव्य पिडांतक,सुकून या सारखी तेल रोज आंघोळी पुर्वी एक तास आगोदर लावून शरीरात मुरवून मग आंघोळ करू शकता.

३) गुळवेल अर्धा चमचा,दोन चिमुटभर सुंठ पावडर,एक चमचा तूप पातळ केलेले घालून मिश्रण चांगले एकत्र करून गरम पाण्याच्या तीन चार घोटा सोबत जेवणाच्या एक तास आगोदर हे चुर्ण घेतल्यास फायदा होतो.कारण गुळवेल ही त्रिदोषनाशक रसायन असून वातरक्त नाशक म्हणजे गाऊट चे जरी त्रास असतील तरी मुक्ती देणारी अशी आहे ही उष्ण प्रकृतीची असल्याने आपल्या शरीरातील वाढलेल्या वात दोषांचे शमन करते.आणि जर ही आपण हे तूप आणि सुंठ या सोबत घेतल्यास पचण्यासाठी सुलभ होते व योग्य जागेवर जाऊन याचा प्रभाव दाखवते.व वात पित्त विषम स्थीतीत वाढल्याने होणारे दोष टाळते *चरकसंहिता सुत्रस्थान अध्याय २७मध्ये तूपा सोबत घेतल्यास वातपित्तविषोन्मादशोष* अस तूपाच वर्णन यामुळेच केलेल आढळते.

४) दशांग लेप

दुखणार्या भागावरील वेदनांचे शमन करण्यासाठी, तथा वेदना पासून मुक्ती मिळण्यासाठी आयुर्वेद रोज आपल्याला दशांग लेप हा दुखणार्या भागावर हा लेप लावायचा सल्ला देते,यात दहा वनस्पती असून हा विशेषतः जाँईन्ट वर लावल्यास खूप फायदे दिसतात यात लागेल एवढा लेप गरमपाण्यात घालून तो कढई मध्ये गरम करून वरून खाली या स्वरूपात रात्री आपल्या दुखणार्या भागावर लावून त्यावर घट्ट कापड किंवा पट्टी बांधावी यामुळे या भागावर असलेली सूज वेदना कमी होईल.

५) नस्य

या बाबतीत आयुर्वेदात म्हंटल आहे की नस्य केल्याने शरीर रिलँक्स होऊन गळ्यावरील अनेक त्रासापासून सुटका होते जर तुम्हाला स्पाँन्डेलीसीस असेल तर तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरेल तसेच थकवा कमी झाल्याने तुमच्या शरीरात असलेल्या वेदनां पासून ही मुक्ती मिळेल यासाठी तीळ तेल,किंवा अणू तेलाचे दोन दोन थेंब नागपुडीत सोडावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

50 मिनिटे ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

57 मिनिटे ago

मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…

1 तास ago

Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…

शिक्रापूर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

5 तास ago

मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सरकारचे वाभाडे काढले! इंग्रजांपेक्षाही वाईट कारभाराचा संदेश जात असल्याची टीका

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी…

1 दिवस ago

सोनियाजींच्या पुस्तकाची पाने फाडणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार; विजय वडेट्टीवार

महिला शेतकऱ्यांची यवतमाळ ते नागपूर भव्य पदयात्रा काढणार; केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी मदतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची…

1 दिवस ago