क्राईम

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची भीती दाखवायची, माहिती अधिकाराचा गैरवापर करुन संस्थेला जेरीस आणण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्या प्रकारातून तब्बल ७० लाख रुपयांची मागणी करायची. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे खंडणी मागितल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संतोष यशवंत आडसूळ (वय ३६, रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. शरद वसंतराव फराटे (वय ४८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर) यांनी याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष आडसूळ याने २० जुलै २०२५ आणि १६ जून २०२६ रोजी बोरी पारधी तसेच मांडवगण फराटा येथील श्री. वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर संस्थेला वेठीस धरण्याच्या उद्देशाने विविध प्रकारे दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे. महाविद्यालयाविरोधात विद्यापीठ स्तरावर तसेच संबंधित शिक्षण संस्थांकडे पत्राद्वारे आणि ई-मेलद्वारे खोट्या तक्रारी केल्या जातील, माहिती अधिकाराचा वापर करुन वैयक्तिक माहिती मागवली जाईल, व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून विविध शिखर परिषदांची भीती दाखवून संस्थेची बदनामी व अडचण निर्माण केली जाईल, अशा प्रकारचा दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकारातून संस्थेकडे तब्बल ७० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असुन या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीसाठी तक्रारींचे हत्यार दबावतंत्राचा खेळ …?
लोकशाही व्यवस्थेत तक्रार करणे, माहिती अधिकाराचा वापर करणे आणि प्रशासनाकडे दाद मागणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, याच अधिकारांचा आधार घेत एखाद्या शैक्षणिक संस्थेला सतत तक्रारींची भीती दाखवून आर्थिक मागणी केली जात असेल, तर हा प्रकार निश्चितच गंभीर आहे. तक्रारींच्या माध्यमातून दबाव निर्माण करून लाखोंची मागणी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या प्रकरणातुन पुढे आला आहे. त्यामुळे या कथित दबावतंत्रामागील नेमका उद्देश आणि संपूर्ण घटनाक्रम तपासातून उघड होणे आवश्यक आहे.

यापुर्वीही शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, संतोष आडसूळ याच्याविरुद्ध यापुर्वीही शिरुर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नव्या खंडणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करताना या पुर्वीच्या गुन्ह्याची पार्श्वभुमीही महत्त्वाची ठरणार आहे.

अखेर पोलिसांची कारवाई; आरोपी येरवडा कारागृहात
या प्रकरणात शिरुर पोलिसांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी संतोष आडसूळ याला अटक केली. त्यानंतर त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करत आहेत.

सखोल चौकशी करण्याची मागणी…
७० लाखांची मागणी नेमकी कशाच्या जोरावर करण्यात आली…? संस्थेला धमकावण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा वापर झाला…? या कथित प्रकारामागे आणखी काही आर्थिक व्यवहार किंवा इतर व्यक्तींचा सहभाग आहे का…? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणे गरजेचे आहे.

शिरूर तालुक्यात शिक्षण संस्थांना तक्रारींची भीती दाखवून आर्थिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर अशा प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत उत्तर मिळणे आवश्यक आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून ७० लाखांच्या कथित खंडणी प्रकरणाचे नेमके वास्तव काय, हे स्पष्ट होणार आहे.

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

खंडणी उकाळणाऱ्या सहा गुंडाना शिरूर पोलीसांनी केले गजाआड

शिरूर शहरातील व्यापाऱ्याला मागितली कोट्यावधीची खंडणी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…

1 दिवस ago

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

2 दिवस ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

2 दिवस ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

2 दिवस ago

मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…

2 दिवस ago

Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…

शिक्रापूर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

2 दिवस ago