महाराष्ट्र

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई: वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून भाजपा महायुती सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध असतानाही पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने ही दडपशाही तातडीने थांबवून आंदोलकांशी चर्चा करावी आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाची सर्व कामे थांबवून तो कायमस्वरूपी रद्द करावा, अशी आक्रमक मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात गेल्या १०० हून अधिक दिवसांपासून भूमिपुत्र, आदिवासी, मच्छीमार, शेतकरी, महिला आणि युवक आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिला, लहान मुले आणि ग्रामस्थांशी पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. सरकारने पोलीस दडपशाही तातडीने थांबवावी आणि या घटनांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वाढवण बंदर प्रकल्पामुळे पालघरच्या किनारपट्टीवरील पर्यावरण, सागरी जैवविविधता, पारंपरिक मासेमारी व्यवसाय आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती आहे. भूमिपुत्रांचे अस्तित्व आणि निसर्ग उद्ध्वस्त करून साधला जाणारा विकास काँग्रेसला कदापी मान्य नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

भूमिपुत्रांच्या न्यायासाठी काँग्रेस मैदानात

काँग्रेस पक्ष भूमिपुत्र, मच्छीमार, आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा संघर्ष सुरूच राहील. सरकारने जनतेच्या भावना आणि स्थानिकांच्या हक्कांचा आदर करून वाढवण बंदर प्रकल्पाबाबत फेरविचार करावा, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

42 मिनिटे ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

52 मिनिटे ago

मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…

1 तास ago

Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…

शिक्रापूर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

5 तास ago

मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सरकारचे वाभाडे काढले! इंग्रजांपेक्षाही वाईट कारभाराचा संदेश जात असल्याची टीका

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी…

1 दिवस ago

सोनियाजींच्या पुस्तकाची पाने फाडणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार; विजय वडेट्टीवार

महिला शेतकऱ्यांची यवतमाळ ते नागपूर भव्य पदयात्रा काढणार; केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी मदतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची…

1 दिवस ago