cash
शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दीड महिना पोलिसांना गुंगारा देणारा शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश मुंढे अखेर गजाआड झाला. मात्र, मुंढेच्या अटकेनंतर आता या संपूर्ण लाचखोरी प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंढेने स्वतःसाठी आणि नेमक्या कोणत्या वरिष्ठ ‘बाप ‘असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती? त्या कथित वरिष्ठांपर्यंत लाचेची रक्कम पोहोचणार होती का? आणि आता त्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे काम लाललुचपत विभाग करत असून पुणे येथील लाललुचपत विभागात टाकळी हाजी बीटातील अधिकारी तसेच शिरूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी हजर होते अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आता लाललुचपत विभाग त्या वरिष्ठ ‘बापाची चौकशी करून गुन्ह्यात सामील करणार का? का वरीष्ठांना वाचवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
टाकळी हाजी पोलीस चौकीत एसीबीने ३० सप्टेंबर २०२६ रोजी सापळा रचला होता. तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि प्रकरणात मदत करण्यासाठी मुंढेने स्वतःसह वरिष्ठांच्या नावाने माझा वरीष्ठ बाप वरती बसलाय त्यालाही पैसे द्यावे लागतील. असे म्हणत एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्षात रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाची चाहूल लागताच मुंढेने लाचेची रक्कम आणि गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन पलायन केले. त्यानंतर तब्बल दीड महिना तो फरार राहिला. अखेर सोमवारी एसीबीच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला (दि. २०) शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंढेच्या अटकेने कारवाईचा एक टप्पा पूर्ण झाला असला, तरी या प्रकरणातील खरे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
एसीबीच्या पडताळणीत वरिष्ठांच्या नावाने लाच मागितल्याचा मुद्दा समोर आला असेल, तर तपासाचा केंद्रबिंदू केवळ मुंढेपुरता मर्यादित राहता कामा नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेमके नाव काय? मुंढेने त्यांच्या सांगण्यावरून पैसे मागितले होते की स्वतःच्या फायद्यासाठी वरिष्ठांचे नाव वापरले? लाचेच्या रकमेतील काही हिस्सा वरिष्ठांपर्यंत जाणार होता का? याचा सखोल तपास सुरु असून वरिष्ठांना आरोपी करणे गरजेचे आहे.
केवळ हवालदारावर कारवाई करून प्रकरण संपवणार की बड्या साहेबांपर्यंत तपास पोहोचणार?
शिरूर पोलीस ठाण्यातील या गाजलेल्या लाचखोरी प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसीबीच्या तपासात वरिष्ठांची नावे किंवा त्यांच्याशी संबंधित पुरावे समोर येतात का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. मुंढेच्या पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून कोणती माहिती समोर येते, त्याचे कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी होते का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
शिरूरकरांचा थेट सवाल एकच – लाच मागणारा हवालदार गजाआड झाला; पण त्याने ज्या ‘बड्या साहेबां’च्या नावाने पैसे मागितले, त्यांच्यापर्यंत तपासाची सुई कधी पोहोचणार? की कारवाईचा संपूर्ण भार एका हवालदारावर टाकून वरिष्ठांना अभय मिळणार? या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. मात्र, लाचखोरीच्या मुळाशी जाणारा निष्पक्ष तपास आणि जबाबदारी निश्चित होणे हीच आता नागरिकांची अपेक्षा आहे.
दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर जेरबंद!
शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…
रामदास जगताप यांना लाच घेतला रंगेहात पकडले अन् झाली अटक…
पुणे जिल्ह्यात लाच घेताना उपविभागीय अधिकारी रंगेहात सापडला…
तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…
संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…
पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…
SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…
शिक्रापूर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी…