शिरूर तालुका

वढू बुद्रुक शाळेला सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक कक्ष व सहा संगणक प्रदान…

कोरेगाव भीमा: श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर)  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र वढू बुद्रुक शिवले मळा येथे एच एम क्लाउस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंडामार्फत आत्याधुनिक संगणक कक्ष इमारत उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

श्री क्षेत्र वढू बुद्रुक गावच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व माजी सरपंच व विद्यमान चेअरमन प्रफुल शिवले यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडला. कंपनीच्या माध्यमातून १ इमारत व सहा कॅम्पुटर असा १२ लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन तंत्रज्ञान व कम्प्युटर शिक्षणाची माहिती देऊन आधुनिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

यावेळी वढू बुद्रुक गावचे उपसरपंच राहुल कुंभार माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले माजी उपसरपंच संतोष शिवले, संजय मस्कु शिवले, शंकर शिवले, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे संचालक हनुमंत शिवले, आर अँड डी मॅनेजर इंडिया एम.आर.संतोषकुमार हेगडे, सी.एस.आर- व्यवस्थापक एशिया गोगई मौचुमी , आयटी विभाग महेश कोंडुकोरी, प्रक्रिया सुधारणा व्यवस्थापक सी एन अनिथा, स्टेशन व्यवस्थापक पुणे तापकीर टी.आर, ब्रीडर ईश्वर बूडी, विक्री प्रफुल थोरात, ग्रामपंचायत समस्या संगीता सावंत, वि.वि.का.सोसायटीचे विद्यमान संचालक संजय शिवले, आनंदराव शिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, माजी अध्यक्ष गणेश शिवले, उपाध्यक्ष रेखा शिवले व सर्व व्यवस्थापन समिती ग्रामस्थ तरुण मित्र वर्ग उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

2 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago