क्राईम

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला! शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर एस.टी. बसस्थानकावर रविवार (दि .११) रोजी दुपारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत ही चोरी झाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्रिमूर्ती नगर, बारामती येथे राहणाऱ्या रूपाली अनिल काळेल या आपल्या मुलगी तन्वी व भाची साक्षीसह मलठण येथील नातेवाइकाच्या लग्नानंतर बारामतीकडे परत येत होत्या. शिरूर बसस्थानकावर त्यांनी फलाटावर उभी असलेल्या चौफुल्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये (क्र. एमएच १४ बीटी ४१९३) प्रवेश केला. काही वेळाने त्यांनी पर्स तपासली असता, साडेसहा तोळे गंठण व दीड तोळ्याच्या कर्णफुलांचा अत्ता नसलेला प्रकार लक्षात आला.

दागिने दिसून न आल्याने श्रीमती काळेल यांनी तातडीने वाहकाला बस थांबवण्यास सांगितले. बसमधील प्रवाशांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आपले बंधू प्रशांत गिते यांना संपर्क साधला. थोड्याच वेळात त्यांच्यासह पोलिसही बसस्थानकावर दाखल झाले.

श्रीमती काळेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पर्समध्ये ठेवलेले ३,९०,००० रुपयांचे गंठण व ७८,००० रुपयांच्या कर्णफुलांचा समावेश होता. एकूण ४,६८,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप तपास करत आहेत.

शिरूर बसस्थानकावर टोळी सक्रिय

या चोरीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा शिरूर बसस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही बसस्थानकावर दागिने चोरी, खिसेकापू व पाकिटमारीच्या घटना घडल्या असून, परजिल्ह्यातील टोळी बसस्थानकावर लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. महिला व लहान मुलांच्या साहाय्याने गर्दीत चोरी करून दुसऱ्या बसने पलायन करण्याची पद्धत या टोळीची असल्याचेही समजते.

पोलिसांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, काही संशयितांबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शिरूर बसस्थानक हे पुणे, अहिल्यानगर, विदर्भ व मराठवाड्याशी जोडणारे प्रमुख केंद्र असून येथे कायमची वर्दळ असते. मात्र, येथे कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. होमगार्ड चंदाबाई चव्हाण यांचा बसस्थानकावर दबदबा असला तरी, त्यांच्या सोबत एक-दोन पोलिसही कायमस्वरूपी नेमावेत, अशी मागणी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…

14 तास ago

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…

14 तास ago

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…

1 दिवस ago

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…

2 दिवस ago

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…

3 दिवस ago