क्राईम

तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आसाम: आसाममधील कछार जिल्ह्यातील सिल्चर शहरात २८ वर्षीय तरुणीवर तब्बल सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराकडून बळजबरीने पैसेही उकळल्याचा आरोप आहे.

१९ फेब्रुवारीची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडिता तिच्या प्रियकरासोबत कारमधून फिरायला गेली असताना, सिलचर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर बायपास रोडवर त्यांना एका एसयूव्हीमधून आलेल्या काही पुरुषांनी अडवलं. आरोपींनी प्रथम त्यांचा पत्ता विचारत संवाद साधला आणि त्यानंतर अचानक दोघांवर हल्ला केला.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुमारे सात जणांनी तिच्या प्रियकरासमोर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तिला एका आरोपीच्या खात्यात १० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी सिल्चर सादर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दोन आरोपींची ओळख पटवली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago