CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
पुणे: पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून झेड ब्रिजजवळ काही युवकांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या 2 गाड्यांचीही तोडफोड केली. यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
हल्ल्याची घटना आणि दहशत
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. 5 ते 6 तरुणांच्या टोळक्याने एका युवकावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्यात अशा प्रकारच्या गँगवॉर सदृश घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिस घटनेचा कसून तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…