क्राईम

शिरुर तालुक्यात चक्क सहावीतील विद्यार्थिनी गरोदर

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे सहावीमध्ये शिक्षण घेणारी 14 वर्षीय विद्यार्थिनी अत्याचाराने गरोदर राहिल्याची खळबळजनक घटना समोर आली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पोटात दुखण्याचे कारण सांगितल्याने विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना हादरा बसला. यावेळी विद्यार्थिनी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान विद्यार्थिनीवर उपचार सुरू करण्यात आले आणि उपचार सुरु असताना विद्यार्थिनीच्या आई सह अन्य नातेवाईकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता कोरेगाव भीमा येथे त्यांच्या घरा शेजारील राहणाऱ्या एका युवकाने युवती दुकानातून घरी येताना तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करत कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली असल्याचे विद्यार्थिनीने आईला सांगितले असल्याने विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

1 तास ago

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

17 तास ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

18 तास ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

2 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

2 दिवस ago

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago