मुख्य बातम्या

शिरुरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरुन तुफान सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून हातातील बिअरच्या मोकळया बाटल्यांनी, लोखंडी रॉडने, दगडाने , हाताने, लाथाबुक्यांनी तुफान सिनेस्टाईल हाणामारी झाली असून याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आदित्य रघुनाथ सरडे, ( वय १८ वर्षे, ) रा. मंगलवाडी राजापुर ता श्रीगोंदा जि अहमदनगर याने 4 युवकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत (दि २७) एप्रिल रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास शिरुर शहरातील श्रीराम मार्केट सीटी समोर तसेच येथील हुडको कॉलनी येथील दत्त मंदिराजवळ यातील आरोपी श्रेयश लंघे (रा .करडे) यास फिर्यादी आदीत्य सरडे याने तु माझ्या मोटार सायकलला कट का मारला…? असे विचारल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी १) श्रेयश लंघे (रा. करडे, ता.शिरुर) २) कार्तिक गवारे (रा. बाबुरावनगर, ता. शिरुर) ३) गणेश ओव्हळ (रा. पिंपरी कोलंदर, ता. श्रीगोंदा जि अहमदनगर) ४) पवन भंडारी ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांनी त्यांच्या हातातील बिअरच्या मोकळया बाटल्यांनी तसेच लोखंडी रॉड, दगडाने व हाताने लाथाबुक्यांनी आदीत्य सरडे याला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली आहे. शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहे.

जबाबदारी टाळण्यासाठी पालकांचे होतेय दुर्लक्ष…?

शिरुर शहरामध्ये शिक्षणासाठी नांमाकित कॉलेज असल्याने शिरुर तालुक्यासह अहमदनगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातून अनेक युवक शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. पालकांनी मुलांना कॉलेजला सोडवण्यासाठी आपला त्रास वाचवण्यासाठी आपल्या पाल्यांना कॉलेजला जाण्या-येण्यासाठी दुचाकी हाती सोपवल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत ही मुले बेकदारपणे वाहने चालवत असून कुणाला धक्का लागल्यास हाणामारी ही करत आहेत. शिरुर पोलिस स्टेशनमधील वाहतुक पोलिसांनी या युवकांवर वेळोवेळी कारवाई केली असून पुन्हा मोठी कारवाई होणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

13 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago