Crime
शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी ता. शिरुर येथे शाळेतील जुन्या वादातून दोघा युवकांना लोखंडी कोयता व पाईप सह लाकडी दांडक्याने मारहाण करुन पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सूत्रधार शिंदे व वैभव पवार यांच्या सहा पाच अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
निर्वी (ता. शिरुर) येथून शुभम जामले व मयूर चव्हाण हे दोघे मित्र जात असताना अचानक एम एच ०१ बी के ३९६० या कार मधून सूत्रधार शिंदे, वैभव पवार यांसह काही युवक आले त्यांनी शाळेत झालेल्या जुन्या वादातून शुभम व मयूर यांना शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी कोयता व पाईपने मारहाण करण्यास सुरवात केली.
यावेळी अनोळखी युवकांनी देखील लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली. यावेळी झालेल्या मारहाणी मध्ये शुभम जामले व मयूर चव्हाण हे जखमी झाले. यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी देत कोयता व लोखंडी पाईप हातात घेऊन दहशत निर्माण केली.
याबाबत शुभम नामदेव जामले (वय २४) रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या युवकाने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सूत्रधार शिंदे, वैभव पवार दोघे रा. शिरसगाव काटा (ता. शिरुर) जि. पुणे यांसह 2 अनोळखी युवक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…