Categories: क्राईम

विठ्ठलवाडीच्या शेतकऱ्याची साडेसात लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो, असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी दत्तात्रय गवारी यांचा शेतीसह कारखान्याचे ऊस तोड करुन कारखान्याला देण्याचा व्यवसाय आहे, गवारी यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणत असतात. गवारे यांची त्यांच्या व्यवसायातून सोमनाथ सोनवणे याच्या सोबत ओळख झालेली होती.

त्यावेळी सोनवणे याने गवारी यांना तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला उसतोड कामगार आणून देतो, असे म्हणून कामगारांना उचल द्यावी, लागेल असे म्हणून कामगारांना देण्यासाठी वेळोवेळी तब्बल 7 लाख 50 हजार रुपये घेतले त्यांनतर आज कामगार येतील. उद्या कामगार येतील, असे म्हणत कामगार पुरविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सोनवणे हा पुन्हा गवारी यांना भेटलाच नाही व त्याने कामगार देखील पुरवले नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याबाबत दत्तात्रय निवृत्ती गवारी (वय ५४) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सोमनाथ शेम्पू सोनवणे रा. कौळाणे ता. मालेगाव जि. नाशिक या व्यक्तीवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

9 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

9 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

14 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

18 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago