शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करत महिलेला मारहाण करुन महिलेला जखमी करत महिलेच्या अंगातील 4 तोळ्याचे दागिने व काही रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आले आहे.
जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील समिंद्राबाई मासळकर या घराच्या दरवाजाला कडी लावून घरात झोपलेल्या असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात 3 व्यक्तीनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान घरात झोपलेल्या समिंद्राबाई जाग्या झाल्या असताना घरात आलेल्या अज्ञात व्यक्तीनी त्यांना मारहाण करत डोक्याने कशानेतरी मारून जखमी करत त्यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे दागिने काढून घेत जवळील 4 हजार रुपये देखील काढून घेऊन पोबारा केला.
सदर घटनेत समिंद्राबाई कानबा मासळकर (वय ८५) रा. रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे या जखमी झाल्या असून याबाबत सुदाम कानबा मासळकर (वय ५८) रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. कदमवाक वस्ती ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …