क्राईम

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून युवकांचा हॉटेलमध्ये राढा

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या युवकाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने युवकांमध्ये वादावादी होत काचेच्या बाटलीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल चालकासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील ओमसाई हॉटेल मध्ये अभिषेक नाईकनवरे व त्याचा साथीदार विकास काळे हे दोघे जेवण करण्यासाठी गेलेले असताना तेथे जेवण करत असलेल्या 4 व्यक्तीपैकी एकाचा अभिषेकला धक्का लागला त्यामुळे अभिषेकने त्यांना जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. यावेळी त्या चौघा युवकांनी अभिषेक व विकास या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत काचेच्या बाटलीने दोघांना मारहाण केली. यावेळी हॉटेल चालक असलेले चलसानी यांनी देखील अभिषेक यास हाताने व लाथाबुक्य्यांनी मारहाण केली. सदर घटनेत अभिषेक अंकुश नाईकनवरे हा जखमी झाला.

याबाबत अभिषेक अंकुश नाईकनवरे (वय २७) रा. धर्मनाथ मंदिरा शेजारी पिंपळे जगताप (ता. शिरूर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हॉटेल ओमसाईचे चालक चलसानी यांच्या सह 4 अनोळखी व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago