आरोग्य

झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास काय होत

लसणामध्ये असे अनेक औषधी गुण आढळतात, जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतात. वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणानं पचन तंत्र मजबूत राहतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, सर्दी-खोकला बरा होतो, शरीर डिटॉक्स होतं. त्याचप्रमाणे लसणाचं तेलही फायदेशीर असतं. लसणाच्या तेलानं जर रात्री तळपायांची मालिश केली तर काय होईल.

खोबऱ्याच्या किंवा मोहरीच्या तेलात लसूण गरम केल्यावर या तेलानं पायांची मालिश केली तर कफ, सूज, श्वास घेण्याची समस्या किंवा फुप्फुसासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. लसणाच्या तेलानं मालिश करण्याचा हा उपाय फार पूर्वीपासून केला जातो. अशात याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

लसणाच्या तेलानं पायांची मालिश करण्याचे फायदे

झोपेची समस्या होईल दूर

अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अशात लसणाच्या तेलानं पायांची मालिस केली तर ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. या तेलानं मालिश केल्यास मांसपेशींना आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

फुप्फुसांची समस्या होईल दूर

जर तुमच्या छातीमध्ये कफ जमा झाला असेल आणि फुप्फुसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर रात्री झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश करा. यानं श्वासासंबंधी समस्या दूर होईल.

पायांचं दुखणं होईल दूर

जर पाय कोणत्या कारणानं दुखत असेल तर लसणाच्या तेलानं पायांची मालिश करणं फायदेशीर ठरू शकतं. यानं पाायांचं दुखणं दूर होईल आणि मसल्सना आराम मिळेल.

हृदयासाठी फायदेशीर

लसूण खाणं ज्याप्रमाणे हृदयासाठी फायदेशीर असतं. तसंच लसणाचं तेलही हृदयासाठी फायदेशीर ठरतं. लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगल्याप्रकारे होतं. ज्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज होत नाहीत.

तळपायांवर लसूण घासण्याचे फायदे

लसणाच्या तेलासोबतच लसूण पायांवर घासणं देखील फायदेशीर ठरतं. या उपायानं पावसाळ्यात पायांमध्ये होणारं फंगस टाळता येतं. हिवाळ्यात पायांवर लसूण घासल्यास उष्णता मिळते आणि तापही कमी होतो. लसणाची कळी ठेवून पायांवर घासली तर ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago