शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील मावलाईचा मळा येथे राहणारे पांडुरंग गायकवाड व त्यांच्या शेजारी राहणारे संपत लोंढे यांच्यात शेजारील सांडपाणी घरासमोर येत असल्याने वाद झाला होता. त्या वादाच्या कारणातून संपत लोंढे व आदींनी गायकवाड यांच्या घरा समोर जाऊन बेकायदेशीर गर्दी जमवून गायकवाड यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत घरा समोरील सांडपाण्याच्या कारणातून बेदम मारहाण केली.
याबाबत पांडुरंग शिवाजी गायकवाड (वय ३९) रा. मावलाईचा मळा कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संपत लोंढे, आशा संपत लोंढे दोघे रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे, विकास लोंढे, शंकर लोंढे, महेश हरिभाऊ लोंढे, तिघे रा. बागवान नगर वढू खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…