क्राईम

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे, सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे अजित वाबळे व आशाबाई गवारे यांची एकत्रित जमीन सडून सदर जमिनीत बांधकाम करण्याहून त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. दरम्यान याबाबत अजित सुभाष वाबळे (वय २८) रा. वाबळेवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे व आशाबाई ज्ञानेश्वर गवारे (वय ५०) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या.

शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे व 2 अनोळखी व्यक्ती सर्व रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे तसेच सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे दोघे रा. वाबळेवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago