शिरूर तालुका

पुणे नगर रोडवर लावलेल्या फ्लेक्स मनोऱ्यांमुळे अपघाताचा धोका

असंख्य दुर्घटना होऊन देखील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह संपूर्ण पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोंढापुरी येथे अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या असंख्य फ्लेक्सच्या मनोऱ्यामुळे यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात झालेले असून सध्या वादळामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या असताना पुणे नगर रस्त्यावर अनेक लहान मोठ अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना फ्लेक्स मनोऱ्यांचे मोठे जाळेच निर्माण झाले असून या ठिकाणी असलेले सर्व फ्लेक्सचे मनोरे धारकांवर कारवाई करून हे मनोरे काढून टाकण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे नगर रस्त्यावर असलेल्या शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भिमा यांसह आदी भागामध्ये मोठमोठे फ्लेक्स लावण्याची सध्या स्पर्धा सुरु झालेली असून या फ्लेक्समुळे यापूर्वी अनेकदा अपघात झालेले आहेत.

शिक्रापूर येथे यापूर्वी एका मोठ्या दुकानावर फ्लेक्स मनोरा पडून संपूर्ण दुकान जमीनदोस्त होत दुकानातील नागरिक बचावले होते, तर मनोऱ्यावर फ्लेक्स लावत असताना युवकाला विजेचा धक्का बसला होता तर एका ठिकाणी मनोरा वाहनांवर पडून चार वाहनांचे नुकसान झालेले असताना अनेक प्रकार होऊनही प्रशासनास जाग आलेली नसताना प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही मात्र पुणे येथे नुकत्याच घडलेल्या घटनेने आता शिक्रापूर करांना देखील यापूर्वीच्या घटनांची आठवण पुन्हा होऊ लागली आहे.

मात्र पुणे नगर रस्त्यावर सर्वत्र लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या मनोऱ्यांपैकी काही मनोरे हे राजकीय पुढाऱ्यांचे असून अनेकदा राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवस, निवडी तसेच त्यांच्या जवळील व्यक्ती व नेत्यांचे फ्लेक्स येथे लावले जातात त्यामुळे राजकीय पुढारी देखील याबाबत काही बोलत नाहीत. मात्र या भागातील सर्व फ्लेक्सचे मनोरे काढून टाकत मनोऱ्यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

संबंधित विभागांना पत्र देणार; प्रमोद क्षिरसागर (पोलीस निरीक्षक)

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फ्लेक्स होर्डिंग हटवण्याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर विकास प्राधिकरण तसेच संबंधित ग्रामपंचायतींना पत्र देणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.

मासिक मिटिंगला विषय घेतला जाईल; शिवाजी शिंदे (ग्रामविकास अधिकारी)

शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या सर्व फ्लेक्स मनोरे बाबत या आठवण्यात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग मध्ये विषय घेवून निर्णय घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

5 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

6 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago