क्राईम

माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर…

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. इतकंच नव्हे तर तिला बेदम मारहाण करत अडीच तास कारमध्ये कोंबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.

अपहरण करण्यात आलेली 26 वर्षीय तरुणी हिंजवडीमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सेल्स मार्केटिंगचे काम करते. तिचे गेल्या काही महिन्यांपासून एका विवाहित पुरुषाशी प्रेम संबंध होते. ही बाब पत्नीला खटकत होती. अखेर नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला आणि आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केले.

बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-2, विप्रो सर्कल इथ एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. ‘तुमचे पार्सल द्यायचे आहे,’ असे सांगत महिलेला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली.

‘माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी ही पत्नीने तरुणीला दिली. अखेर अडीच तासांच्या थरारा नंतर पोलिसांनी तरुणीची सुटका केली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago