रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.
याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रांजणगाव येथील गट नंबर ११३२ मधील जेसीबी व ट्रॅक्टरचे काम थांबवण्यासाठी ते घटनास्थळी गेले असता, आरोपी शेळके (पूर्ण नाव माहिती नाही) व सचिन शांताराम शेलार (रा. रांजणगाव) या दोघांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला असुन या घटनेचा तपास पोलीस हवालदार अनिल चव्हाण करीत आहेत.
तर याच शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत सचिन शांताराम शेलार (वय ४४, रा. रांजणगाव गणपती) यांना दमदाटी करत हातातील लाकडी बॅटने दत्तात्रय परशुराम शेलार यांनीही दि १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास डोक्यात व पाठीवर मारहाण केली असल्याची परस्परविरोधी तक्रार सचिन शेलार यांनी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे केली आहे.
याबाबत सचिन शांताराम शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असताना आरोपी दत्तात्रय परशुराम शेलार (रा. रांजणगाव, ता. शिरूर) हा तेथे आला. त्याने “ही जागा माझी आहे” असे सांगून फिर्यादीला शिवीगाळ केली तसेच दमदाटी करून हातातील लाकडी बॅटने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर मारहाण केली.
या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मारहाणीमुळे सचिन शेलार यांना दुखापत झाली असून त्यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार अजित पवार हे करत आहेत. या घटनेनंतर एका फिर्यादीने दिलेल्या जबाबात एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या भावाचे नाव घेतलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…