क्राईम

पाबळ मध्ये घरगुती वादातून मायलेकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे घरगुती वादातून मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहिली गणेश पिंगळे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे गणेश पिंगळे व साहिली पिंगळे या पती पत्नी मध्ये घरगुती वाद झालेले असताना साहिली हिची आई व भाऊ त्यांच्या घरी आले. त्यांनी गणेश याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण हाताने, लाथाबुक्य्यांनी तसेच लाकडाने करण्यास सुरुवात केली. यावेळी गणेशची आई लीलाबाई मध्ये गेली असता त्यांनी मारहाण करणाऱ्यांनी लीलाबाई यांना देखील लाकडाने मारहाण करत जखमी केले.

याबाबत लीलाबाई यशवंत पिंगळे (वय ५७) रा. माळवाडी पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी साहिली गणेश पिंगळे रा. रा. माळवाडी पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे रा. वाफगाव ता. खेड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago