क्राईम

पोलिसांची धाड आणि मोठा स्फोटक साठा जप्त; प्रजासत्ताक दिनानिमित्त घातपात टळला

राजस्थान: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, नागौर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या स्फोटक कटाचा उधळा लावला आहे. जिल्हा पोलीस आणि विशेष पथकाने शनिवारी रात्री हरसौर गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकून तब्बल १० हजार किलो अवैध अमोनियम नाइट्रेट जप्त केले आहे. ही आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक मृदुल कच्छावा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुलेमान खान याने आपल्या शेतातील घरात १८७ पोत्यांमध्ये अमोनियम नाइट्रेट लपवून ठेवले होते. यासोबतच पोलिसांनी ९ कार्टन डेटोनेटर, १२ कार्टन निळ्या फ्युज वायरचे १५ बंडल आणि लाल फ्युज वायरचे १२ कार्टन ५ बंडल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

अमोनियम नाइट्रेट हा अत्यंत धोकादायक रसायन असून, याचा वापर यापूर्वी अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झाला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातही अमोनियम नाइट्रेटचा वापर झाला होता. त्यामुळे या साठ्याचा संबंध एखाद्या मोठ्या कटाशी आहे की नाही, याची तपास यंत्रणा सध्या चौकशी करत आहे.

सुलेमान खान याला हरसौर पोलिसांनी अटक केली असून, तो आधीच स्फोटक कायद्यांतर्गत तीन वेळा गुन्हेगार आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हा स्फोटक साठा कायदेशीर व बेकायदेशीर खाणकामासाठी पुरवण्यासाठी ठेवलेला असल्याचा दावा केला आहे.

नागौर पोलिसांनी जप्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना तातडीने दिली असून, संघटित गुन्हेगारी आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मृदुल कच्छावा म्हणाले, “राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सर्व बाजूंनी तपास सुरु असून, लवकरच यामागचे मुख्य सूत्रधार समोर येतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

5 मिनिटे ago

खर्गेंच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’वरून युवक काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये भाजप कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद…

9 मिनिटे ago

विमुक्त समाजाला सहानुभूती नको, घटनात्मक हक्क आणि सन्मान हवा!

५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून देशव्यापी चळवळ उभारणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही मुंबई: विमुक्त समाजाला सहानुभूतीची…

14 मिनिटे ago

मुंबईतील पाणी टँकर लॉबी कोणाची? काँग्रेसचा सवाल; ‘पाणी कपातीत टँकरला पाणी मिळते कुठून’

मुंबई: मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत असून, नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे…

21 मिनिटे ago

‘मोदी सरकार ओबीसीविरोधी; ९८० विद्यार्थ्यांचे IAS-IPS होण्याचे स्वप्न धोक्यात’

विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता…

25 मिनिटे ago

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

10 तास ago