क्राईम

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे घाटाच्या वरील कंपनीतील खोदकामासाठी आलेला जेसीबी काम नसल्यामुळे करडे येथील प्रदीप सरोदे यांचे नविन झालेल्या पेट्रोलपंपावर लावला होता. तो चोरट्यांनी (दि. १७) मार्च रोजी चोरुन नेला. (दि. १८) मार्च रोजी जेसीबी मालक जितेंद्र संजय पठारे हे पेट्रोल पंपावर आले असता जेसीबी त्या ठिकाणी मिळुन आला नाही त्यानंतर त्याचे लक्षात आले कि त्यांचा जेसीबी चोरीला गेला आहे. शिरुर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पो.स.ई .एकनाथ पाटील यांनी एक पथक रवाना करून पोलीस अंमलदार थोरात, हाळनोर यांना तांत्रिक माहीतीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात सांगितले. सदर चोरीस गेलेला जेसीबी न. एम एच १४ एच डब्लु ९९५६ हा तांबा राजोरी ता. पाटोदा जि. बीड येथुन दोन आरोपीस ताब्यात घेण्यात आला. त्यांच्याकडुन मिळालेले माहीती वरुन सदर जेसीबी चोरण्याकरीता कोल्हेवाडी गावातील सुभाष भगवान जगताप याने चोरी करुन आणुन दिल्याचे सांगितले. नंतर सदर आरोपीस पो.स.ई. एकनाथ पाटील, पोलीस हवा.प्रफुल्ल भगत, पोलीस नाईक नाथासाहेब जगताप, पोलीस अंमलदार सचिन भोई यांनी ताब्यात घेतला.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत स.पो.नि संदिप यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई एकनाथ पाटील, पोलीस हवा. उमेश भगत .पो.ना. नाथासाहेब जगताप, पोलीस अंमलदार विनोद काळे, रघूनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, प्रविण पिठले यांच्यापथकाने केली आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago