पुणे: हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आणि त्याला कारण ठरलंय तीन दलित मुलींच्या रुमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण. पोलीसांनी थेट मुलींच्या रुमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे.
नेमकं प्रकरण काय
पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. मात्र पोलिसांकडून चौकशीचं कारण देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून सामाजिक संघटनांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी पोलीसांवर गंभीर आरोप केलाय.
दलित मुलींना त्यांच्या रुममध्ये घुसून पोलिसांनी केलेली मारहाण ही सार्वजनिक ठिकाणी नसल्याचं कारण देत पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला… मात्र कायद्याचे रक्षक पोलीसच मुलींच्या रुमवर जाऊन गुंडगिरी करणार असतील तर कायद्याचे धिंडवडे निघत राहतील… त्यामुळे पोलीस खात्याची अब्रू वाचवण्यासाठी गुंड पोलिसांवर कारवाई करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलय.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…