क्राईम

पुण्यातील प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पुणेः पुणे शहरातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापिकेने मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.

विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला फोन करून, ‘तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,’ अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. हा प्रकार मार्च 2020 पासून आतापर्यंत सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भीती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला.

पुढे या विद्यार्थ्यांने हा व्हिडीओ कॉल इंस्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या आयडीवरुन अनेक ऑडिओ व व्हिडिओ कॉल केले. त्यानंतर वेगळ्या आयडीवरुन त्याने प्राध्यापिकेला आणि त्यांच्या पतीला न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडे 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. त्यानंतर त्यांनी न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago