रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर (तेजस फडके) रांजणगाव पोलिस MIDC स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गालगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला काही अंतरावर एक महिला, दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान आढळून आले होते. सदरचे अनोळखी मृतदेह हे अर्धवट जळालेले होते. त्यामुळे प्रकरणी रांजणगावचे बीट अंमलदार सहायक फौजदार गुलाबराव भिमराव येळे यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली होती.

सदर आरोपीने जवळच्या नात्यातीलच चुलत मामाच्या विवाहित मुलीशी आधी प्रेम संबंध, नंतर शारीरिक संबंध आणि त्यानंतर लग्नाचा तगादा लावल्याने तिच्यासहीत दोन चिमुकल्यांचा निर्घृण पद्धतीने खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल ओतुन तिनही मृतदेह जाळन्याचा प्रयत्न केला. अर्धवट जळालेल्या अवस्थेतले चिमुकल्यांचे मृतदेह पाहुन पोलिसांसहीत प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणि आरोपी विषयी प्रचंड चीड निर्माण झाली होती.

मृत महिला आणि आरोपी जवळचे नातेवाईक…

मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५) रा. वाघोरा, ता माजलगाव, जि.बीड असे असुन आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६) सध्या रा. सरदवाडी ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याच्या भावाला मृत स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृत स्वाती ही आरोपीच्या चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. मृत स्वाती व तिचा नवऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यातील वाद मिटवत असे त्याच दरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यामुळे मृत स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती.

मृत महिला आणि नवऱ्यामध्ये तणाव….

पोलिस तपासादरम्यान मृत स्वाती सोनवणेच्या पतीने स्वाती हि तिच्या दोन मुलांसह आळंदी येथे तिच्या आई-वडीलांकडे गेली होती. तिचे व नवऱ्याचे भांडण होत असल्याने स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज (वय २) आणि विराज (वय १) यांच्यासह स्वातीच्या बहीणीचा दिर गोरख पोपट बोखारे याच्या मोटार सायकलवरुन दि. २३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथुन गेलेली असल्याची माहिती समोर आली.

आरोपीची कबुली अन पोलिस सुन्न…

मृत महिला स्वाती केशव सोनवणे हिचे आई वडील हे आळंदी येथे मोलमजूरी करतात. त्यामुळे दि. २३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथुन आरोपीसोबत गेल्यानंतर त्यांनी तिच्याबाबत पुन्हा माहिती घेतली नाही. ती कोठे आहे हे त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांनी आरोपी गोरख बोखारे याला ताब्यात घेवून त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता. त्यानेच स्वाती सोनवणे आणि तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराजचा खून आणि त्यांचे तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासा दरम्यान सांगितल्यानंतर तपास पथकातील पोलिसही सुन्न झाले.

(क्रमशः)

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

4 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

8 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

8 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

8 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

8 तास ago