क्राईम

शिरूर! डॉक्टर पत्नीला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल…

शिरूर : माहेराहून पैसे घेऊन ये, यासाठी डॉक्टर असलेल्या पत्नीकडे तगादा लावत तीला मारहाण करणाऱ्या पतीसह शारीरीक, मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. पूजा महेश शेळके (वय २८, रा. बाबूराव नगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी त्यांचे पती महेश सुरेश शेळके, सासू द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव शेळके (सर्व रा. श्रीराम नगर सोसायटी, खराडी बायपास, पुणे) यांच्यासह सोनाली विवेक नेवाळे (रा. पिंपरी, पुणे) व चैताली प्रफुल्ल रनवरे (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. पूजा शेळके या येरवडा येथील एका हॉस्पिटल मध्ये कार्यरत असून, काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेले. मात्र, गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२४ पासून) त्यांचे पती महेश व कुटूंबांतील इतरांनी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानीत केले. तसेच डॉ. पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली.

डॉ. पूजा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार शिरूर पोलिसांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार दीपक राऊत करीत आहेत.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago