शिक्रापूर (शेरखान शेख): वाडागाव (ता. शिरुर) येथील एका सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली असून शिक्रापूर पोलिसांनी प्रकाश उमराव मुळे या नराधमावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
वाडागाव (ता. शिरुर) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रकाश मुळे याची ओळख झाल्यानंतर 12 डिसेंबर २०२२ पासून प्रकाश याने मुलीचा पाठलाग करत मुलीच्या घरी जात मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार मुलीच्या घरी जाऊन मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत प्रकाश याने मुलीचे तोंड दाबून मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत दिला धमकी दिली.
घडलेल्या प्रकाराने युवती त्रस्त झाल्याने तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने प्रकाराला वाचा फुटली याबाबत पिडीतेच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रकाश उमराव मुळे (वय २५) रा. भोसरी पुणे मूळ रा. वाडवाना पिंपळगाव ता. बीड जि. बीड याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…