क्राईम

शिरसगाव काटा येथे जबरी चोरी, 1 लाख ४० हजाराचा मुद्देमाल लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जबरी मारहाण करत तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजल्यापासून ११ ऑगस्ट रोजी १२.३० वाजले च्या सुमारास घडले असुन फिर्यादी अमोल अशोक कुंजीर (वय ३१), रा. चव्हाणवाडी, शिरसगाव काटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीने त्यांच्या आईच्या तोंडावर व डोक्यात मारहाण करून सोन्याचे दोन गंठण ८० हजार रुपये कानातील फुले व वेल ४० हजार रुपये आणि मनी मंगळसुत्र २० हजार रुपये असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

12 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago