भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

 

मेष: आजचा दिवस ठिक असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणार आहात. तुमच्या योजनांना मंजुरी मिळेल आणि तुम्ही व्यवसायात पुढे जाणार आहात. योग्य व्यक्ती आणि उत्तम संधी आज मिळाल्यामुळे प्रगतीचे योग आहेत. आज प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी तुमच्यासाठी अनुकूल असतील.निर्णय घेताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या, समस्या मार्गी लागतील.

वृषभ: आजचा दिवस ठिक आहे. आज एखादी व्यक्ती तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवेल, पण तुम्ही प्रलोभनांना बळी पडू नका. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या गोष्टीचा अतीरेक वाईट असतो हे लक्षात ठेवा.नोकरीत तुमच्याकडे जे काम दिलेलं आहे ते उत्तमप्रकारे पूर्ण करणार, वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन डिल होते आहे पण व्यवस्थापन उत्तम करायला हवे.

मिथुन: आजचा दिवस ठिक असून महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहात. यामध्ये यशस्वी होण्यासाठी जास्त वेळ लागेल.आर्थिक लाभ चांगला आहे. मालमत्तेमध्ये गुंतवणुक करणे उत्तम आहे पण त्यासाठी सल्ला घ्या अन्यथा फसवणूक होवू शकते. ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक आहे. जे काही काम असेल ते टीमवर्कद्वारे पूर्ण करा.

कर्क: आजचा दिवस ठिक असून कुटुंबीय आणि मित्रांना भरपूर मदत कराल. घरात वातावरण समाधानी असेल, अचानक धनलाभ होईल. घरातल्यांसाठी आज काही खरेदी करणार आहात. व्यवसायात कामे वाढत आहेत, कामात फोकस आणि नियोजन महत्त्वाचे आहे. नोकरीत नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, त्यात मेहनत जास्त आहे पण फायदा जास्त आहे

सिंह: आजचा दिवस ठिक असून सगळ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही प्रत्येकाला मदत करणार आहात. विविध कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहात. भागीदारीतील व्यवसायात नफा आहे. नोकरी करणाऱ्यांनी कामात फोकस करा. सावध राहा कारण काही कारणामुळे वादाची शक्यता आहे. संध्याकाळी आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्हाला आज भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

कन्या: आजचा आजचा दिवस ठिक असून तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीने प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण करणार आहात. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे घरातील वादावर तोडगा निघेल. तुम्ही क्रिएटीव्ह कामे करणार आहात. आज निर्णय घेताना सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करा. आर्थिक बाबतीत नशिबाची उत्तम साथ असेल.*

तुळ: आजचा दिवस ठिक असून भागीदारीच्या व्यवसायात लाभ आहे. घरात वातावरण मात्र नाराजीचे असेल. व्यक्तीगत समस्या त्रास देतील. घर आणि ऑफिस यामध्ये अंतर ठेवा. तुम्ही सगळी कामे करता आणि जबाबदारी नीट पार पाडता पण सगळं काही एकत्र होतं आणि समस्या येतात. आज काही घटना तुम्हाला गोंधळात टाकतील सतर्क राहा.

वृश्चिक: आजचा दिवस ठिक असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. फोनवरून लोकांना उत्तरे देणे तसेच ईमेल्सला रिप्लाय करण्यात तुमचा वेळ जाणार आहात. एखादा जुना मित्र अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहू शकतो. कोणी उधार मागितले तर त्याला नाही म्हणा. व्यवसायात नवीन डिलसाठी मिटींगला जावे लागेल, तुम्ही दस्तऐवज तसेच प्रेझेंन्टेशन तयार ठेवा.

धनु: आजचा दिवस ठिक असून कार्यक्षेत्रात काही नवीन अधिकार मिळू शकतात. क्रिएटिव्ह कामात रुची वाढेल. आवश्यक वस्तूंची भरपूर खरेदी करणार आहात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद घालू नका. वाणी आणि शब्दांवर नियंत्रण हवे. कामे वाढत आहेत त्यामुळे तणाव वाढेल त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. योग किंवा ध्यानधारणा करा, मन शांत होईल.

मकर: आजचा दिवस उत्तम असून एखाद्या नवीन प्रोग्रामसाठी तुम्ही खूप उत्साहात काम कराल. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. उत्साहाने सगळी कामे मार्गी लावणार आहात. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीचा विचार केला जाईल. उत्साहाच्या भरात खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करा यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

कुंभ: आजचा दिवस ठिक असून थोडाफार आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम सुरुवातील कठिण वाटते पण नंतर तुम्ही त्यात एक्सपर्ट होता. कामात बारीक लक्ष द्या, नियोजन आणि व्यवस्थापन करा तुम्हाला उत्तम फायदा होईल. व्यवसायात काम वाढणार आहेत.

मीन: आजचा दिवस ठिक असून दिवसभर कामात व्यस्त राहणार आहात. कोणत्याही विरोधकांची टीका तुम्हाला त्रास देईल पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही एकाग्रपणे तुमचे काम करत राहा तुम्हाला यश मिळेल. तुमच्या सोशल सर्कलमध्ये संपर्क वाढतील. मान-सन्मानात वृद्धी होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

12 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

13 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

1 दिवस ago