रांजणगाव गणपती: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारानिमित्त पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. शेकडो मीटरपर्यंत पसरलेल्या रांगांमधून ‘हर हर महादेव’च्या जयघोषांनी परिसर दुमदुमला.
मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून आकर्षक सजावट पाहण्यासाठीही भाविक उत्सुक होते. देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद, खिचडी वितरणासह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील शाळकरी मुलांनीही सहलीच्या निमित्ताने सोमेश्वर देवाचे दर्शन घेतले.
भाविकांच्या सोयीसाठी पाणी, सावली व सुरक्षा यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. दिवसभर अभिषेक, भजनी मंडळांची उपस्थिती, सायंकाळी कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. तालुक्यातील विविध भागांतून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…