shikrapur-tanker-fire
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. गॅस कंटेनरने पेट घेतल्याने दोन ते तीन कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याशिवाय एक हॉटेल आणि तीन घरांना मोठी आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र ही घटना गॅस चोरी करताना घडल्याचं समोर आलं आहे.
गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झाले. शिक्रापूर-चाकण मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. स्फोटाचे आवाज एक किलोमीटर परिसरापर्यंत गेले होते. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
एका ढाब्याच्या समोर कंटनेरमधून गॅस चोरी केली जात होती. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणे सुरू असताना गॅसचा स्फोट झाला. घटनास्थळी तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे.
दरम्यान, गॅस चोरीच्या प्रकारात स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास केला जात आहे.
शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही, घरातील सर्व साहित्य जळून खाक
शिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात 20 वर्षीय तरुणी जखमी
पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी
तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय
शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या…
शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य…
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…