शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसून अक्षय विठ्ठल कंद्रूप या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे अक्षय कंद्रूप या युवक (दि. २३) जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याच्या एम एच १२ पि जि ६४४८ या बुलेट दुचाकी हून चाललेला असताना जातेगाव खुर्द येथील पंजाबी खालसा हॉटेल समोर शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे आलेल्या एच आर ५५ वाय ५२२४ या कंटेनरची अक्षयच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला. यावेळी अक्षय जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अक्षय विठ्ठल कंद्रूप (वय २४) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
याबाबत शिवाजी बबन कंद्रूप वय ६२ वर्षे रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एच आर ५५ वाय ५२२४ या कंटेनर चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…