शिरूर तालुका

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

अनाथ नेहाला देखील मिळाला आयुष्यभराचा जोडीदार

शिक्रापूर: वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून माहेर संस्थेत नुकताच १८८ वा विवाह सोहळा पार पडला असल्याने माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला असून नेहाला आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेमध्ये काही दिवसांपूर्वी अपघातातून बचावलेली तसेच कोणी पालक नसलेली नेहा पोलिसांच्या माध्यमातून दाखल झाली होती. माहेर संस्थेतून मिळालेल्या आश्रय व शिकवणीमुळे नेहा मोठी झाली. नुकताच तिचा विवाह सांगली येथील उद्योजक श्रीकांत शेंडे यांचे चिरंजीव सुबोध यांच्याशी ठरला असता तर मधुसूदन गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरीयन, माहेर संस्थेचे व्यवस्थापक विश्वस्थ योगेश भोर, सहसंचालक रमेश दुतोंडे, मिनी एम. जे, माया शेळके, तुषार जोशी, रमेश चौधरी, विक्रम भुजबळ, यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

सदर विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते माया शेळके, अनिता भालेराव, अतुल शेळके, विष्णू सूर्यवंशी, विक्रम भुजबळ, अनिता दुतोंडे, निता सुर्यवंशी, वसंतराव यादव, विष्णू सुर्यवंशी, अमोल त्रिभुवन यांसह आदी उपस्थित होते. सदर विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नुकत्याच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याने अनाथ असलेल्या नेहाला कायमचे पालक व आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे. दरम्यान माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

5 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago