क्राईम

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) दत्तात्रय भुजबळ हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालायला गेलेले होते. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी कट्ट्यावर बसून भुजबळ मोबाईल पाहत असताना तिघे युवक सदर ठिकाणी आले. त्यातील एका युवकाने भुजबळ यांचा मोबाईल ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भुजबळ यांनी प्रतिकार केल्याने तिघांनी त्यांना तोंडावर, छातीवर बेदम मारहाण करत त्यांचा मोबाईल काढून घेत पोबारा केला.
घडलेल्या घटनेबाबत दत्तात्रय आनंदराव भुजबळ (वय ५४) रा. कारभारी वस्ती माळीमळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

15 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

18 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

21 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

22 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

2 दिवस ago