Crime
शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथील विजया जोशी यांचे पती कामाला गेलेले असताना त्या घरात झोपलेल्या होत्या पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजारील मुलाने जोशी यांना आवाज देऊन दरवाजा उघडा का आहे, असे म्हटल्याने जोशी बाहेर आल्या असता त्यांच्या घराच्या हॉल मधील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे आणि कपाट उघडे असल्याचे तसेच खिडकीचे गज कापल्याचे दिसले.
यावेळी त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील तेरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीस हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असा तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे खिडकीचे गज कापून खिडकीतून हात घालत दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विजया दिलीप जोशी (वय ३७) रा. आनंदनगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. माणिकदौंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…