क्राईम

पुणे नगर महामार्गावर रक्षाबंधनच्या दिवशीच दोघा युवकांवर काळाचा घाला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग हे दोघे युवक ठार झाले असून राजवर्धन सचिन हापसे हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ सि टी ४००० या दुचाकीहून श्रीरामपूर येथे रक्षाबंधन साठी चालला होता. शिक्रापूर येथील जकाते वस्ती येथे हापसे याची दुचाकी भरधाव वेगाने येत असताना अचानक अचानक अहमदनगर बाजूने येणारी एम एच १२ एस टी ७४०४ हि दुचाकी येथील मिलटोन कंपनीच्या बाजूने पुणे अहमदनगर बाजूकडे आली. यावेळी हापसे यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला यावेळी समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोघे खूप लांब अंतरावर फेकले गेले. दरम्यान अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती यामध्ये दोन्ही दुचाकी वाहनांचा चक्काचूर झाला.

दरम्यान येथील नागरिकांनी तातडीने येथील तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग दोघे रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला तर राजवर्धन सचिन हापसे रा. श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाला असून याबाबत आर्या विनीत होले (वय २०) रा. कर्वेनगर पुणे मूळ रा. शिवाजीरोड श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर याचे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago