क्राईम

शिरूर शहरातील खून प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते. या वादा नंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला होता. खुन करून फरार झालेल्या आरोपीस शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे.

०१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याचा सुमारास शिरूर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले (वय ४३, रा. पाण्याचे टाकी जवळ, शिरूर) यांचे त्यांची सून अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते. या वादाच्या कारणावरून सुनेचे दोन भाऊ १) नागरेष बाजीराव काळे, २) राजेश बाजीराव काळे व एक बहीण ३) निघु बाजीराव काळे (सर्व रा. पाण्याची टाकी जवळ, शिरूर) यांनी कोयता उलटा करून बोथट बाजू कडून कोयत्याने छातीत, पायावर मारून डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती. त्या जबर मारहाणीत वसंत भोसले हे ५ ऑगस्ट रोजी मरण पावले होते. गुन्हा घडल्यापासून आरोपी नागरेष बाजीराव काळे हा फरार होता.

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस अमलदार विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरार आरोपी हा चाफेकर चौक चिंचवड येथे येणार असल्याचे समजल्याने पोलिस अंमलदार विजय शिंदे यांनी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना सदर बातमीबाबत माहिती दिल्याने सदर आरोपीस गुन्हयाच्या कामी ताब्यात घेण्याबाबत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला आदेशित केले. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि हणमंतराव गिरी यांचे पथकामधील पोलिस अंमलदार नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार विजय शिंदे, निलेश थोरात हे बातमी मिळालेल्या ठिकाणी चाफेकर चौक चिंचवड येथे जावून सापळा लावून शिताफिने आरोपीस पकडून ताब्यात घेतले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा .पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोसई दिलीप पवार, पो .हवा. नाथसाहेब जगताप, परसराम सांगळे, पोलिस अमंलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांचे पोलिस पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई दिलीप पवार, शिरूर पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

7 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

15 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago