क्राईम

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : अण्णापुर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७) यांना ‘तुझा तर कार्यक्रम करतो, तु दारुबंदी कशी करतो तेच बघतो, तुझ्यावर बायकोला बोलावून अॅट्रॉसिटी दाखल करतो,’ अशी धमकी देत शिविगाळ केली आहे. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई दशरथ जगताप (रा. अण्णापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. ३) सकाळी निलेश वाळुंज व त्यांची आई मंदा यशवंत वाळुंज असे दोघे जण घरासमोर अंगणात उभे असताना गोविंद जगताप हा घरासमोर आला व त्याने निलेश वाळुंज यांच्या आईकडे पाहून हातवारे करून म्हणाला की, ‘तुझ्या मुलाला काय रात्री लई माज आला होता काय? आता बोलवना पोलिसांना काय माझी वाकडे करणार आहे.” असे म्हणून परत रात्री झालेल्या प्रकार प्रमाणे मला तुझा तर कार्यक्रम करायचाय असे म्हणत मग कसा दारूबंदी करतो तेच बघतो. माझ्या पत्नीला चाकण येथून बोलावून घेतो व तुझे घरासमोर कपडे काढून भोंगळी करून तुझ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो असे म्हणाला.

सदर ठिकाणी निलेश वाळुंज यांची आई मंदा यशवंत वाळुंज हिच्याकडे अश्लील हातवारे करून व अश्लील शब्द बोलून आईच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने ती घरामध्ये निघून गेली आहे. त्यानंतर निलेश वाळुंज यांनी डायल ११२ व शिरूर पोलीस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली. थोड्या वेळाने पोलीस गावामध्ये आले त्यावेळी तो त्या ठिकाणावरून निघून गेला होता. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई दशरथ जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास श्री. आगलावे हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago