न्हावरे (तेजस फडके): मोटेवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी संदीप दौलत येलभर यांच्या गट क्र. ६८६ मधून १,४०० किलो डाळिंब (किंमत अंदाजे १ लाख ४० हजार) चोरीला गेले होते. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश करुन शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सदर प्रकरणात आरोपी असणाऱ्या भामट्याला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे.
दि ७ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ८ जुलै पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने डाळिंबाची चोरी केली होती. परंतु शेतकरी संदीप येलभर यांना पहाटे अचानक जाग आल्यावर त्यांनी शेतात फेरफटका मारला असता अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी क्रं एम एच १२-वाई ई ४०२३ जाग्यावरच सोडुन पळ काढला होता. याबाबत संदीप येलभर यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे संशयित वाहनाचा तपास लावला. सदर गाडी ही आकाश बशीर काळे (रा. सोनसांगवी) याच्याच मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
दि १४ जुलै रोजी आरोपी आकाश काळे हा रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत त्याला सापळा रचून अटक केली. पोलिस तपासादरम्यान आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता दि १६ जुलै २०२५ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हि यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड व अजय पाटील यांनी केली आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…