शिरूर तालुका

शिरूर नगरपरिषदेचा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर नगरपरिषद हद्दीतील शासकीय मुलींच्या वसतीगृह परिसरात वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कू, जांभूळ यांसारख्या उपयोगी व पर्यावरणपूरक २३७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘वेस्ट टू वंडर’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत शाळांमध्ये फेकून दिलेल्या साहित्याचा – जसे टायर, प्लास्टिक बाटल्या, दोरी, पुठ्ठा, लाकूड इत्यादी – वापर करून आकर्षक कलाकृती व देखावे साकारण्याची कल्पक संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये शहरातील ०७ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या शाळांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर उर्वरित सहभागी शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेचे संपूर्ण यंत्रणा सक्रिय होती. कार्यक्रमास शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक श्रीमती वैशाली सटाले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, आर. एम. डी. इंग्लिश मिडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी घारु, विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती मुळे, तसेच शिरूर नगरपालिका शाळा क्र. १, ३ व ६, जीवन विकास मंदिर, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल या शाळांचे शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

तसेच नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, कर निरीक्षक माधव गाजरे, नगररचना सहाय्यक पंकज काकड, सहा. कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे व श्रीम. शितल काळे, लेखापाल अंकुश इचके, अंतर्गत लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, विद्युत अभियंता तेजस शिंदे, स्थापत्य अभियंता शामली लाड, भूषण कडेकर, चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, मिठ्ठू गावडे, शहर समन्वयक प्राची वाखारे, प्र. स्वच्छता मुकादम मनोज आहिरे, किरण जाधव, गणेश शेंडगे, मनोज शेळके, रामशरण आडोळे, महेश लोळगे, स्वप्नील तरटे, सागर बडगुजर, गौरव कुलथे,नीता जाधव यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

याशिवाय नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाला आपले योगदान दिले. या कार्यक्रमातून शिरूर नगरपरिषदेच्या पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेविषयीच्या बांधिलकीचा प्रत्यय आला. वृक्षारोपण आणि वेस्ट टू वंडर यांसारख्या उपक्रमांद्वारे शिरूर शहरात स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago