शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील तांदळी येथे अष्टविनायक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत अजय सुरेश बरडे (रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालका विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुन 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तांदळी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत तांदळी-निर्वी अष्टविनायक महामार्गालगत असणाऱ्या विटभट्टीजवळून फिर्यादीचे चुलते अनिल कचरु बरडे (वय 35, रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) सायकलीवरुन तांदळी गावातून इनामगाकडे येत होते. त्यांच्या सायकलीला पाठीमागून येणाऱ्या कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे अनिल बरडे यांचा अपघाती मृत्यू झाला.
दरम्यान, अजय बरडे यांनी अज्ञात वाहनचालका विरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार कदम हे करत आहेत.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या कडेला असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, बाभुळसर…
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील…
विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; “दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही का?”…
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन…
मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन…