क्राईम

मंदिरात दर्शनासाठी जाताना ज्येष्ठ व्यक्तीचा डंपरच्या धडकेने मृत्यू…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील चौकामध्ये राजाराम विश्वनाथ रोकडे (वय 95 रा. वाळुंजनगर,आंबेगाव जि.पुणे) यांचा भरधाव डंपरच्या धडकने मृत्यू झाला आहे.

डंपर चालक फक्कड मारुती शेटे (वय 50 रा. संविदाणे, ता. शिरूर जि.पुणे) हा टाटा कंपनीचा डंपर गाडी नंबर एम एच 14 डीएम 64 50 चालवत होता. राजाराम विश्वनाथ रोकडे यांच्या पायावरून डंपर गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्या नंतर खडकवाडीतील ग्रामस्थांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला ताबडतोब लोणी येथील हॉस्पिटलमध्ये हलविले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ज्येष्ठ व्यक्ती राजाराम विश्वनाथ रोकडे हे जुन्या पिढीतील लोणी परिसरातील निष्णांत सुतार कारागीर होते. वाळुंजनगर ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते. ते सकाळी पंढरपूरला जाण्याऐवजी धामणी खिंड येथील ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांच्या मागे एक मुलगा सेवानिवृत्त तलाठी शिवाजी रोकडे व चार मुली व पत्नी आहे.

सदर घटनेची तक्रार प्रशांत प्रताप रोकडे (रा. वाळुंज नगर) याने पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे. गु. र. नं 113/2023भा. द.वि. क 304(2),279,338 मो. वा. क, क प्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago